---Advertisement---

Parola: आई फाउंडेशनच्या शिबिरात १६६ दात्यांचे रक्तदान

---Advertisement---

Parola :   येथील आई फाउंडेशन तर्फे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल १६६ दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला.

 

या शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री डॉ.  सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  रक्तदात्यांना गौरव पत्र तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.

 

यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, माजी जि प सदस्य रोहन पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉक्टर शांताराम पाटील, तालुकाध्यक्ष संतोष महाजन, माजी जि प सदस्य हिम्मत पाटील, बाजार समिती संचालक मनोराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक  अनुष्ठान , ऍड तुषार पाटील,  डॉ. योगेंद्र पवार, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रा. आर. बी.  पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डाँ. शांताराम पाटील, शहराध्यक्ष महेश पाटील, आई हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वैशाली नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील, शहर तलाठी निशिकांत पाटील, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी धुळे येथील जीवन ज्योती ब्लड सेंटर व रक्त विघटन प्रयोगशाळा यांच्या टीमने रक्त संकलन केले. या उपक्रमाचे माजी पालकमंत्री डॉ.  सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, तहसीलदार डॉ.  उल्हास देवरे यांनी कौतुक केले.

 

आई हॉस्पिटल व आई फाउंडेशनच्या सलग तिसऱ्या वर्षीच्या महारक्तदान शिबिरात उस्फूर्तपणे तरुणाईने तसेच महिला वर्गांनी सहभाग घेत रक्तदान शिबिर यशस्वी केले.

सूत्रसंचालन व आभार आई फाउंडेशनचे अध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment