---Advertisement---

शांतता आणि एकजुट काय असते हे मराठ्यांनी दाखवून द्यावे, मनोज जरांगे यांचे आव्हान

by team

---Advertisement---

Maratha reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर . बदनामीकारक आरोप केल्यांनतर त्यांनी घोषणा केली होती की, ते एक दिवसांचे मौन बाळगणार आहेत, दरम्यान, त्यांनी मौन सोडत आपली भूमिका मांडली आहे . ”३ मार्चला प्रचंड शक्तीशाली रास्ता रोको होणार. शांतता आणि एकजुट काय असते हे मराठ्यांनी दाखवून द्यावे.”

जरंगे-पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, २४ तारखेपासुन रोज सकाळी १०:३० ते १ वाजेपर्यंच रास्ता रोको आंदाेलन करण्‍यात येईल. राज्यातील सर्व मराठे आरक्षणाच्‍या आंदाेलनात सक्रीय आहेत. ३ मार्चला प्रचंड शक्तीशाली रास्तारोको होणार. शांतता आणि एकजुट काय असते हे मराठ्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन शांततेत सुरु राहील, असे स्पष्ट करत दररोज दोन टप्प्यात रास्ता रोको आंदोलन होईल. रविवार (दि.२४) पासून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, ३ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन केले जाईल. या पुढील मराठा आरक्षणासाठी केलेले आंदाेलन हे देशातील सर्वात मोठे आंदोलन असेल, अशी माहिती जरांगे-पाटील यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---