अकोला: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आल. यानंतर आज गटाच्या नव्या चिन्हाचं रायगडाहून लोकार्पण करण्यात आल. या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे
रायगडसारख्या पवित्रस्थळी राजकीय चिन्हाचं लोकार्पण होणं ही बाब चुकीच आहे, असं आमदार मिटकरी म्हणाले. आम्हीही रायगडावर कार्यक्रम केलेत, मात्र राजकीय बिल्ले आणि उपरणे वापरले नाहीत. आजच्या लोकार्पण सोहळ्याला शरद पवार गटाचे अनेक आमदार का अनुपस्थित होते? अस मिटकरी म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांना तुतारी वाजवण्याचं आव्हान
जितेंद्र आव्हाडांनी आज फक्त तुतारी वाजविण्याचं नाटक केलं. तुतारी वाजवितांना पोट आतमध्ये जावं लागतं. आव्हाडांचं पोट बाहेर होतं. जितेंद्र आव्हाड यांना सर्वांसमोर एकट्याने तुतारी वाजवण्याचं आव्हान दिलंय, त्यांनी एकट्याने वाजवून दाखवावी, त्यांना एक लाखाचा धनादेश देतो. अस मिटकारी म्हणाले.
राजेश टोपे आमच्या संपर्कात
शरद पवार यांच्या जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे नेते आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.यावेळी मिटकरींनी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्याबाबत मोठा दावा केला. राजेश टोपेंसह शरद पवार गटातील पाच ते सहा बडे नेते लवकरच अजितदादा गटात येणार असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. अजितदादांवर टीका करणारे रोहित पवार आज कालवा बैठकीच्या निमित्ताने अजितदादांशी काय बोललेत?, असा सवाल आहे यावेळी आमदार मिटकरींनी केला.