---Advertisement---
मुंबई : सध्याच्या काळात कोणत्याही सरकारी योजनेसाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. आधार कार्डसाठी किमान वय पाच वर्षे नमूद करण्यात आलं आहे. मग त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी काय असा प्रश्न अनेकांना पडतो. तर शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ब्लू आधार कार्ड किंवा बाल आधार कार्डची तरतूद करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी हे आधार कार्ड बनवण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक होता, मात्र आता जन्म प्रमाणपत्र नसतानाही ब्लू आधार कार्ड बनवता येणार आहे. वास्तविक या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक्स आवश्यक नाहीत. तुम्ही घरी बसूनही या आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. अनेक ठिकाणी मुख्यतः शहरांतील शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी ब्लू आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकदा त्याची गरज भासते.
असा करू शकता अर्ज
तुम्ही UIDAI च्या अधिकृत पोर्टलवर (www.UIDAI.gov.in) जा,आता तुम्हाला आधार कार्डच्या लिंकवर क्लिक करावे लागेल, यानंतर एक नवीन विंडो उघडेल.
आता इतर सर्व माहिती जसे की मुलाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा,भरलेली माहिती एकदा तपासून फॉर्म सबमिट करा,यानंतर तुम्हाला UIDAI केंद्रात जावे लागेल,व्हेरीफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ब्लू आधार कार्ड दिले जाईल.
अर्ज केल्यापासून 60 दिवसांच्या आत तुम्हाला ब्लू आधार कार्ड हे घरपोच मिळेल.