---Advertisement---
ठाणे : शिवसेना माजी आमदार रवी फाटक यांची ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ‘उबाठा’ चे राजन विचारे आणि रवी फाटक यांची तुल्यबळ लढत होणार असल्याचं चित्र आहे. दिवगंत आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये लढाई आता जवळपास निश्चित झाली आहे.
ठाण्यातून पुढील काही दिवसांमध्ये रवींद्र फाटकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे विरूद्ध रविंद्र फाटक अशी लढत होणार आहे. रविंद्र फाटक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक होत आहे.