---Advertisement---

परदेशातून भारतात आले फिरायला, आणि जोडप्यासोबत झाले असे काही…

by team
---Advertisement---

दुमका : भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका परदेशी महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या दुमका येथे घडली आहे. या परदेशी महिलेवर सात आरोपींनी मिळून सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी हे निषेधार्ह कृत्य करताना महिलेला लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली.

पीडित महिलेच्या कायदेशीर मदतीसाठी स्वतंत्र टीम बनवण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा दखल घेऊन स्वतंत्र रिपोर्ट् मागवला आहे. रविवारपर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दुमका पोलिसांनी दिली. अजून चौघांचा शोध सुरु आहे.

सर्व आरोपी कुंजो आणि आसपासच्या गावातील आहेत. आतापर्यंतच्या चौकशीतून आरोपींचा हा पहिला गुन्हा असल्याच स्पष्ट झालय. पण अजूनही चौकशी सुरु आहे. आरोपींनी संपूर्ण गुन्ह्यादरम्यान महिलेच्या नवऱ्याचे हात-पाय बांधून ठेवले. त्याला सुद्धा मारहाण केली होती .

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment