---Advertisement---
भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवरवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी अशनीर ग्रोवरचा युनायटेड किंगडमला (यूके) प्रवास करण्यास नकार देत त्यांना देश सोडून जात येणार नाही असहि सांगितलं आहे.
अशनीर ग्रोवर आणि त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांनी दिल्ली पोलिसांकडे देश सोडण्याची परवानगी मागितली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी दिल्ली पोलिसांना निवेदन सादर केले. अश्नीर ग्रोव्हरने आपल्या विनंतीमध्ये सांगितले होते की, त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अतिथी व्याख्यान देण्यासाठी जावे लागेल. अशनीरला 9 ते 15 मार्च दरम्यान देशाबाहेर जायचे होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी अशनीर आणि त्याच्या पत्नीचा अर्ज फेटाळून लावला.
भारतपे ने यापूर्वीच अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. भरतपेने EOW मध्ये 81 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून बोगस पेमेंटद्वारे कंपनीचे सुमारे 81.30 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप भारतपेने केला होता. याप्रकरणी अश्नीर आणि त्याच्या पत्नीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी या संदर्भात अशनीरला यापूर्वी अमेरिकेत जाण्यास बंदी घालण्यात आली होती.