धक्कादायक! मांजरीच्या चाव्यामुळे 11 वर्षीय बालकाचा मृत्यू

by team

---Advertisement---

 

नागपूर :  जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका 11 वर्षीय बालकाला माजरीने चावा घेतल्यानंतर काही तासात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्रेयान्शु क्रिष्णा पेंदाम असं मुलाचं नाव आहे. मुलगा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता. खेळत असताना मांजरानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पायाचा चावा घेतला, असं आईला सांगितलं. त्यानंतर काही वेळानं त्याला मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. त्याचे आईवडील त्याला घेऊन डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दरम्यान, हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली असून  त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.संपूर्ण हिंगणा तालुक्यात श्रेयान्शुच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---