बलकौर सिंह आणि चरण कौर सिंह दुसऱ्यांदा झाले आई-बाबा; सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म

by team

---Advertisement---

 

Sidhu Moose Wala: दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवालाच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.बलकौर सिंह आणि चरण कौर सिंह दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.चरण कौर सिंहने  वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे.सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी नुकताच बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी बलकौर सिंह यांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत बाळदेखील दिसत आहे. त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये,”परमेश्वराने शुभदीपच्या लहान भावाला आमच्या मांडीवर ठेवले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि त्याच्या आईची तब्येत बरी आहे. सर्व हितचिंतकांच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.” असं लिहल आहे. बलकौर सिंग यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या पोस्टला कमेंट करुन बलकौर सिंग आणि चरण कौर यांना शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---