---Advertisement---
तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला आहे या हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये सहा नागरिक ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. खोस्तमध्ये दोन महिलांचा घर कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याचेही जबिहुल्ला मुजाहिद यांनी म्हटले आहे.