---Advertisement---
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकी भाजप-मनसे युती बाबत दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं बोललं जात आहे.
राज ठाकरे काल (18 मार्च) संध्याकाळी मुंबई विमानतळावरुन दिल्लीच्या दिशेला रवाना झाले. ते काल रात्री 11 वाजेच्या सुमारास दिल्लीत पोहोचले. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दिल्लीला गेले आहेत. त्यानंतर आज सकाळी त्यांची दिल्लीत भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबत बैठक पार पडली. विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप युतीचे प्रयत्न दोन्ही बाजून केले जात आहेत. त्याचसाठी राज ठाकरे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचे फोटो पोस्ट करत भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं, असं अमित शाह आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.