IPL 2024 : CSK संघात मोठा बदल! ‘हा’ मराठमोळा खेडाळु बनला CSK चा नवा कर्णधार

by team

---Advertisement---

 

IPL 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पण त्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीने एक मोठी घोषणा करत महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधार पद सोपवले आहे. धोनीने गेल्या हंगामात चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल जिंकून दिले होते आणि आता त्याने संघाची कमान गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे.

आयपीएलच्या 2024 च्या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याआधी CSK ने संघाच्या कर्णधार पदात बदल केला आहे. फ्रँचायझीने युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर विश्वास दाखवत त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. 27 वर्षीय गायकवाड सीएसकेचा चौथा कर्णधार असेल. धोनीशिवाय याआधी रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी कर्णधारपद भूषवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---