---Advertisement---
RD-33 Engines: भारत संरक्षण क्षेत्रात स्वत:ला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि विमानांवर सतत प्रयत्न करत आहे. भारत लवकरच स्वदेशी लढाऊ विमानांना चालना देण्यासाठी इंजिन बनवण्यास सुरुवात करणार आहे. लवकरच एक टीम RD-33 इंजिनचे उत्पादन सुरू करेल. हे इंजिन भारतीय हवाई दलाच्या मिग-२९ ताफ्याला उर्जा देईल.
यामुळे मिग-२९ लढाऊ विमानांचे परिचालन आयुष्यही वाढणार आहे. मात्र, हे इंजिन बनवण्यासाठी रशियाची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात रशियाशी करार झाला आहे. विशेष म्हणजे RD-33 इंजिन भारतात बनवण्याची चर्चा आहे. ते इंजिन पाकिस्तानच्या JF-17 थंडर लढाऊ विमानातही वापरले जात आहे. परंतु यासाठी पाकिस्तानला चीनच्या चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनवर अवलंबून राहावे लागते. JF-17 हे हलके, बहुउद्देशीय आणि सिंगल इंजिन असलेले लढाऊ विमान आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला या कामाचे कंत्राट मिळाले आहे. 1 मार्च 2024 रोजी संरक्षण मंत्रालयाने कंपनीला RD-33 इंजिनच्या निर्मितीसाठी 5,249.72 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. याबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की, ‘हे एरो इंजिन एचएएलच्या कोरापुट विभागात तयार केले जातील. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात असे म्हटले आहे की या इंजिनच्या निर्मितीमुळे इतर अनेक गोष्टींसह स्वदेशी थीमवर काम करण्यास मदत होईल.