---Advertisement---
दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित आरोप ठेऊन ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक केली. यानंतर केजरीवाल यांना आता 28 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीचं सरकार कोण आणि कसं चालवणार हा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सरकार चालवावं, किंवा दिल्लीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या विश्वासू आतिशी यांनी सरकार चालवावं यासह अनेक पर्यायांवर विचार करण्यात आला. अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून जल मंत्रालयाशी संबंधित त्यांनी पहिला आदेश जारी केला आहे. त्यामुळे केजरीवाल हे तुरुंगातूनच सरकार चालवणार हे स्पष्ट झालं.