मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?

by team

---Advertisement---

 

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे.वळसे पाटील घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटलांवर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटलांवर निवडणूकीची मोठी जबाबदारी असताना दुखापत झाली आहे. शिरुरचे अजित पवार गटाचे आमदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---