---Advertisement---

शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

by team

---Advertisement---

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव, शिर्डीत सदाशिव लोखंडे, दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा सांगितला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबाबत चर्चा सुरु होती. शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---