---Advertisement---

ब्रेकिंग: राज्यपाल कोश्यारी राजीनामा देणार?

by team
---Advertisement---

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. याबाबत राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र, आता पंतप्रधान काय निर्णय घेतात हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.

राज्यपालांनी काय म्हटलं?


“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की, या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment