---Advertisement---

शेतकऱ्यांचा शेतीचा दवाखाना म्हणजे कृषी केंद्र : पालकमंत्री गुलाबराव पाटील

by team

---Advertisement---

जळगाव :  भारत हा कृषीप्रधान देश असून, या देशातील शेतकरी हेच खरे संशोधक आहेत. तर गावा गावातील कृषी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी शेतीचा दवाखाना आहे. इस्रायलसारख्या देशाचे कृषी तंत्रज्ञान अवगत करून कृषी समृद्धीच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. पाटील कृषी केंद्र हे गावातील व परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरावे . कृषी केंद्राच्या नियमांचे पालन करून कृषी केंद्र धारकांनी शेतकरी हित जोपासावे. भागपुर प्रकल्पामुळे धानवड व जळके परिसराचा कायापालट होणार असून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाणार आहे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते धानवड येथे गुढी पाडव्याच्या मुहर्तावर कृषी केंद्राच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.

यावेळी सरपंच संभाजी पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष ब्रिजलाल पाटील, प्रगतशील शेतकरी दामू पाटील, कैलास पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, युवराज पाटील, भिकन पाटील, ग्रा. पं. सदस्य पंडीत पाटील, अरुण पाटील, अर्जुन पाटील, प्रभुदास पाटील, मधुकर पाटील, श्रावण पाटील, जनार्धन पाटील, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्यासह विका सोसा.सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---