---Advertisement---

Jalgaon News: विजेच्या धक्का लागल्याने चिमुकलीचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

---Advertisement---

जळगाव: जिल्हयातील किनोद गावात राहणाऱ्या बारा वर्षीय चिमुकलीचा कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १२ एप्रिल रोजी घडली,याबाबत जळगाव तालुका पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. अक्षदा किशोर मोरे असे मयत बालिकेचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बारा वर्षीय अक्षदा ही आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहत होती. तिचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई ही हात मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होती. दरम्यान शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळेला विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. तिथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तिला मयत घोषित केले. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment