---Advertisement---
---Advertisement---
मुंबई: लोकसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर केलेल्या विकासकामांमुळे आपण हा पाठिंबा देत असल्याचे म्हटले. त्यांच्या या भूमिकेनंतर उबाठा गटाने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘राज ठाकरे सातत्याने भूमिका बदलतात’, अशी टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे.
‘कधीही राजकीय भूमिका न बदलल्याबद्दल तुमचा दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळावा’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत बदललेल्या राजकीय भूमिकांचा पाढाच पत्रात वाचला आहे. आपल्यासारखा इतका प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा-भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेली व्यक्ती आजच्या राजकारणातच काय, तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मिळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असेलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्यावतीने आपला ‘दुधाने
अभिषेक’ करू इच्छितो.