---Advertisement---

तरुणा निर्घृण खून : पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

by team

---Advertisement---

जळगाव : शहरातील आव्हाणे रस्त्यावर एका तरुणाची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी उघड झाली आहे. आव्हाणे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या जिनिंग मागील शेतात ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या मालकीची लक्ष्मी जीनिंग आहे. या जिनींगमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या एका तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास जिनींग मागील भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे, श्पवान पथक, ठसे तज्ञ आणि कर्मचारी पोहचले आहेत. मयताचे नाव सुरेश परमसिंग सोलंकी वय – ४० रा.गेहिज खेमला, जि.सेंधावा, मध्यप्रदेश असे असून मृताजवळ काही वस्तू आढळून आल्या असून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरा फुटेज, श्वान पथकाने दाखवलेला मार्ग आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---