आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने हमाल मापाडी यांना बागायती रुमालाचे वाटप

by team

---Advertisement---

 

जळगाव : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने १ मे रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले. यात ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जळगाव जिल्हा यांनी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या आदेशानुसार व त्यांचा मार्गदर्शनाखाली ग्राहक जनजागृती व हमाल मापडी संघटना यांना उन्हा पासून बचाव व्हावा या करीता बागायती रुमालाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रुख्मिणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज जैन हे उपस्थित होते. याप्रसंगी ग्राहक संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विजय साखला, जळगाव जिल्हा अध्यक्ष विजया पांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शुभांगी बिऱ्हाडे, सचिव नूतन तासखेडकर, जिल्हा संघटक मंगला दायमां, हजरत बिलाल कमिटीचे अध्यक्ष अकील पहेलवान सर्वांच्या हस्ते कामगारांना बागायती रुमालाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सदस्य अनिल बिऱ्हाडे, विनोद अढाळके, लक्ष्मण पाटील, गणेश सोनार आदींचे सहकार्य लाभले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---