जळगाव : येथील भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उन्हापासून संरक्षण होऊन आरोग्य चांगले राहावे म्हणून २०० हमाल कामगारांना पांढरे रुमाल व मठ्ठा यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष विशाल चोरडिया, कोषाध्यक्ष रामेश्वर भावसार, सहसचिव डॉ. विकास चौधरी, उद्योजक धनंजय खडके, तुषार तोतला, डॉ. सुरेश अग्रवाल, श्रीहर्ष खाडिलकर, विजय सोनार, अनिता भावसार, हर्षाली खडके, विकास तळेले, संजीव पाटील, अनिरुद्ध कोटस्थाने,श्याम दायमा, प्रभाकर महाजन यांची उपस्थिती होती.