---Advertisement---
जळगाव : यॅलेसेमियासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे माहीरचा पुनर्जन्म झाला असल्याची भावना माहीरची आई तबसूम तडवी यांनी व्यक्त केली. नुकताच जागतिक थैलेसेमिया दिवस साजरा झाला. संपूर्ण कुटुंबाला होरपळून काढणारा असा रक्ताचा गंभीर आजार म्हणजे यॅलेसेमिया. अनुवंशिक म्हणजे आपल्या आई-वडिलांकडून येणाऱ्या इतर वैशिष्ट्यांसारखाच. माहीरदेखील अशाच आजाराला अगदी जन्मताच बळी पडला आणि अगदी खंबीरपणे लढत राहिला. दर १५ ते २० दिवसांनी रक्त घेऊन तो अगदी थकून गेला होता.
वयाच्या आठव्या वर्षी आम्ही त्याचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट संकल्प फाऊंडेशनतर्फे गुजरातमधील सिम्स हॉस्पिटलमध्ये केले. याबाबत फारशी माहिती आम्हाला नव्हती, परंतु डॉ. सई नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. ट्रान्सप्लांटच्या वेळी काही संसर्गामुळे अगदी मृत्यूच्या दाढेतून तो बाहेर आला व त्याचा पुनर्जन्म झाला असे वाटते. आज ट्रान्सप्लांट करून दोन वर्षे पूर्ण झाली असून या १० वर्षाच्या परिश्रमाला यश आले.
आज माहीर पूर्णतः थैलेसेमिया मुक्त आहे, असे म्हणता येईल. अगदी इतर मुलांसारखे हसत खेळत जीवन तो जगत आहे. आपल्या जिल्ह्यातील पॅलेसेमियाग्रस्त बालकांना वेळोवेळी निःस्वार्थ आणि अतिशय योग्य मार्गदर्शन डॉ. सई नेमाडे वेळोवेळी करीत असतात. सतत इंजेक्शन व हॉस्पिटल यामुळे मुले त्रासलेली असतात. अशावेळी मुलांना सरप्राईज भेटवस्तू देऊन आनंदीत करतात. त्यांचे मानसिक आरोग्य त्या जपतात. त्यांच्या सहकार्यामुळे दोन बालकांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांटदेखील यशस्वी झाले आहे.