---Advertisement---

‘नरेंद्र मोदी भविष्यात तीन वेळा पंतप्रधान… वाराणसीत गंगा पूजन करताना पंडिताची भविष्यवाणी

by team
---Advertisement---

वाराणसी:  दशाश्वमेध घाटावर पंतप्रधान मोदींच्या गंगा पूजन आणि आरतीवेळी येथे सहा पंडित उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गंगा पूजन आणि आरती करणाऱ्या सहा पंडितांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. पंडित म्हणाले की, पीएम मोदी जिंकतील.

पुढील तीन टर्मसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचे पंडितांनी सांगितले. पंडितांनी दावा केला की, पंतप्रधानांना गंगा मातेचा आशीर्वाद आहे.नरेंद्र मोदी यावेळीही निवडणूक जिंकले आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले तर ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील.

पंडितांचे भाकीत खरे ठरले तर नरेंद्र मोदी हे सर्वात जास्त काळ देशाचे पंतप्रधान असतील.लोकसभा निवडणुकीसाठी पीएम मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचे समर्थक गणेशवर शास्त्री द्रविड उपस्थित होते. 2014 आणि 2019 मध्ये पीएम मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यावेळी भाजपने त्यांना येथून पुन्हा उमेदवारी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment