---Advertisement---

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख जाहीर, ४ लाख ८९ हजार ६६० देणार विद्यार्थी परीक्षा

by team

---Advertisement---

नाशिक :  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षा ६०१ केंद्रांवर होणार आहेत. या परीक्षा २४ मे ते १२ जून या कालावधीत होतील. विद्यापीठाच्या विविध अभ्यास केंद्रावरील ४ लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडावे याकारिता विद्यापीठाने विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत अभ्यास केंद्रांना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक इत्यादी विविध घटकांतील आहेत. विविध ११५ शिक्षणक्रमांच्या विविध विषय मिळून तब्बल तीस लाखांहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---