---Advertisement---

शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे प्रा. भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर

by team
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. जूनमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत शिक्षक लोकशाही आघाडीने अहमदनगर येथील प्राध्यापक भाऊसाहेब कचरे या शिक्षक कार्यकर्त्याला उमेदवारी घोषित केली आहे.

बुधवार २२ मे आझम कॅम्पस पुणे येथे महाराष्ट्र टीडीएफचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या समितीच्या बैठकीत प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र टीडीएफचे महासचिव हिरालाल पगडाल, कार्याध्यक्ष जी. के .थोरात, नाशिक विभाग टीडीएफ चे अध्यक्ष संजय पवार( धुळे), आर. एच .बाविस्कर,(जळगाव ) आबासाहेब कोकाटे (अहमदनगर ) टी. एन. पाटील( नंदुरबार, ) नानासाहेब फुंदे(मुंबई), मुख्याध्यापक संघाचे राज्याचेअध्यक्ष केरूभाऊ ढोमसे (पुणे) या उमेदवार निवड समितीच्या सदस्यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

टीडीएफ अर्थात शिक्षक लोकशाही आघाडीचे या मतदार संघात प्राबल्य असून 1988 पासून अस्तित्वात आलेल्या नाशिक, अहमदनगर ,जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात झालेल्या सहा निवडणुकांपैकी पाच निवडणुकांमध्ये टीडीएफ या संघटनेचेच शिक्षक उमेदवार आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, विद्यमान आमदार किशोर दराडे, नाशिक जिल्हा मराठा या संस्थेचे विश्वस्त ऍड.  संदीप गुळवे यांच्यासह या विभागातील इतर दहा इच्छुक उमेदवारांनी दिनांक 10 मे रोजी शिर्डी येथे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या.

प्राध्यापक भाऊसाहेब कचरे हे दीर्घकाळ संघटनेचे पदाधिकारी असून अहमदनगर जिल्ह्यातील टीडीएफ सहित सर्व शिक्षक संघटनांनी एकमताने त्यांच्या नावाची शिफारस महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीकडे केली.  तसेच प्रा.कचरे हे अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था या 12000 शिक्षक सभासद असलेल्या संस्थेचे 1998 पासून नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या संस्थेत कर्जावर अवघा ७% व्याजदर व संस्थेत अनेक सभासद हितांच्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ही संस्था राज्यातील शिक्षकांच्या संस्थेमध्ये ” मार्गदर्शक संस्था “म्हणून ओळखली जाते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment