---Advertisement---

जितेंद्र आव्हाड मनोविकृत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ; ना. गुलाबराव पाटील

by team
---Advertisement---

जळगाव : जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती लिहिले पोस्टर्स फाडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरप फोटो फाडल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी बुधवार, २९ रोजी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक समावेश करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे.

या घटनेविरोधात राज्यात भाजपाकडून आंदोलन केले जात आहे. या घटनेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भानगड लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेला प्रकार हा वाईट आहे. अशा माणसावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. देशाचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या हातात आहे हे या माणसाला कळत नाही हा मनोविकृत माणूस आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भानगड लावण्याचे प्रयत्न केले आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही गुलाबराव पाटलांनी केली.

जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आले. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षात राहिले नाही. विरोधक त्यावर राजकारण करणार, मी मनुस्मृती जाळू नये म्हणूनही राजकारण केले. माझ्या हातून चूक झाली. मी अत्यंत लीन होऊन माफी मागतो. मनुस्मृती या शब्दाच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यात कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो आहे म्हणून फाडलं, असे म्हणत त्यांनी माफी मागितली.
नी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment