भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार येणार हे स्पष्ट आहे. आज एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. या बैठकीला जाण्याआधी एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीए चे नेते आहेत. शिवसेना भाजपाच नातं खूप जुनं आहे. विचारधारा एक आहे. आम्ही सुरुवातीपासून भाजपा एनडीए बरोबर कायम आहोत. आमचा पाठिंबा त्यांना आहे. आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आहे. परवाच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी सर्वानुमते नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या संसदीय पक्षाच नेता म्हणून निवडलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक होत आहे. ही महत्त्वाची बैठक आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावेत, हे सर्व देशवासियांच स्वप्न साकार होईल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“विरोधी पक्ष अपयशी ठरले. मोदी हटाव बोलणाऱ्यांना जनतेने हटवलं. बहुमत एनडीएला दिलं. ही अभिमानाची बाब आहे. आमची आघाडी मोदींसोबत आहे. त्यांचे हात मजबूत करणार. १० वर्षात काम करुन दाखवलं. अजून पाच वर्ष संधी मिळालीय. ही अभिमानाची बाब आहे. मागच्या १० वर्षात देशाचा जेवढा विकास झाला, तेवढा मागच्या ५०-६० वर्षात झालेला नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
जनतेने त्यांनाच तडीपार केलय
“नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार हा ऐतिहासिक क्षण आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचा आमचा उद्देश आहे, तो यशस्वी होतोय. मोदींना तडीपार करा बोलणाऱ्यांना जनतेने तडीपार केलय” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.