---Advertisement---

रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्री मंडळात समावेश : रावेर येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

by team

---Advertisement---

रावेर :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी पार पडत आहे. यात खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी मिळाल्याने आज रावेर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी यामध्ये खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी मिळाल्याने आज रावेर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच शपथविधी सोहळा मोठ्या स्क्रीनवर लाइव्ह दाखवण्यात आला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष रंजना पाटील, पंचायतराज ग्राम विकास जिल्हा संयोजक सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, धनगर समाजाचे युवानेते संदीप सावळे, तालुका सरचिटणीस चंदू पाटील, पद्माकर महाजन,  प्रल्हाद पाटील, डॉ. कुंदन फेगडे, महेश पाटील, राहूल पाटील के-हाळा, दुर्गादास पाटील, रविंद्र पाटील, राहूल महाजन, चेतन पाटील, उमाकांत महाजन, राजेंद्र चौधरी, संजय पाटील, पी. के. महाजन, नितीन पाटील, संजय पाटील आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

रावेर मतदारसंघाचा सन्मान
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडुन खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपदासाठी मिळालेली संधी ही रावेर लोकसभेतील संपूर्ण मतदारांचा सन्मान असल्याचे प्रतिपादन जिप माजी उपाध्यक्ष तथा लोकसभा निवडणुक प्रमुख नंदकिशोर महाजन यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---