---Advertisement---

भरधाव जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने दिली धडक; मुलगा जखमी

by team

---Advertisement---

जळगाव : घरासमोर खेळणाऱ्या मुलास भरधाव मोटारसायकलने आठ वर्षीय मुलाला जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना बुधवार, १२ जून रोजी घडली होती. या प्रकरणात शनिवार १५ जून रोजी एमआयडीसी पोलिसात स्टेशनला अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार, १२ जून रोजी अयोध्या नगरातील लीला पार्क येथे घरासमोर आठ वर्षाचा मनिष सचिन जैन हा मुलगा रात्री ८.३० वाजता खेळत होता.  यावेळी भरधाव वेगात येत  दुचाकीने त्याला धडक दिली. या धडकेत मनिषच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्यावर उपचार घेतल्यानंतर त्याचे वडील सचिन रमेश महाजन यांनी शनिवारी १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वारावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---