---Advertisement---
लखनौ : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका मदरशात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मौलाना अजीजुल रहमान यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अजीझुल या मदरशात मुलांना धार्मिक शिक्षण देतो. कुकर्म केल्यानंतर त्याने विद्यार्थ्याला तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी देत असे. आरोपीने विद्यार्थ्याला त्याच्या घरी नेण्याचाही प्रयत्न केला.
पीडित विद्यार्थ्यींनीच्या वडिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवार, दि. २५ जून २०२४ एफआयआर नोंदवली. यानंतर मौलाना अजीझुलला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण रामपूर जिल्ह्यातील अझीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. नांगलिया अंकील गावात जामिया अरेबिया सिराजुल उलूम नावाचा मदरसा आहे. रामपूरच्या मिलक खानम भागातील अल्पवयीन मुली या मदरशात शिकतात.
पीडितेच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी मदरशात धार्मिक शिक्षण घेते. मौलाना अजीजुल रहमान तेथे धार्मिक शिक्षण देतो. मौलाना हा मदरसा ज्या गावात बांधला आहे त्याच गावातील रहिवासी आहे. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या एक वर्षापासून मौलानाने वारंवार त्यांच्या मुलीचा बलात्कार केला.
कुकर्म केल्यानंतर अजीझुल पीडितेस तोंड बंद ठेवण्याची धमकी देत असे, कोणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी तो देत असे. सोमवार, दि. २४ जून रोजी मौलानाने पीडित विद्यार्थिनीवर त्याच्या घरी येण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पीडितेने मौलानाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून आपले घर गाठले.
घरी आल्यानंतर तिने संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. पीडित विद्यार्थींनीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मौलाना अजीझुलच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३७७ आणि ५०६ आणि POCSO कायद्याच्या कलम ३/४ अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.