---Advertisement---

मंगेशकर घराण्याचे संगीत देशभक्तीचा संस्कार देणारे !

by team

---Advertisement---

मुंबई : “मंगेशकर घराण्याने आपल्या गाण्यातून केवळ मनोरंजन नाही तर संस्कार दिले. देशभक्तीचा संस्कार देणारे असे मंगेशकर घराण्याचे संगीत आहे.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या आशाताई भोसले यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणारे मराठीतील पहिलं पुस्तक ‘स्वरस्वामिनी आशा’ शुक्रवार, दि. २८ जून रोजी सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले. सदर कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व) संपन्न झाला. आशाताई भोसले स्वतः मंचावर उपस्थित होत्या.

आशाताई व मंगेशकर घराण्याविषयी बोलताना सरसंघचालक पुढे म्हणाले, “मंगेशकर घराण्याविषयी आदराची भावना माझ्या मनात पूर्वीपासूनच आहे. लतादीदी आणि आशाताईंनी राष्ट्रीयत्वाला अनुकुल असे संगीत भारताला दिले. लतादीदींनी निवृत्तीच्या अंगाने माणसाला घेऊन जाणारी गाणी दिली तर आशाताईंनी आपल्या गाण्यातून प्रवृत्तीच्या अंगाने पुन्हा त्याच ठिकाणी माणसाला आणून सोडलं. मनुष्याचं जीवन घडवणारं गाणं त्यांच्या संगीतातून मिळाले आहे. संगीताची परंपरा मनुष्याच्या जीवनात महत्त्वाची आहे. आशाताईंचं गाणं केवळ त्यांचे न राहता आज देशातील प्रत्येक सामान्य माणसाचं ते झालं आहे. उद्याच्या इतिहासात मंगेशकर घराण्याची नोंद झालेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आशाताईंचं गाणं यापुढेही असंच चालू राहावं हीच मनोकामना.”

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment