---Advertisement---

Murder : जामनेर तालुक्यात महिलेचा खून ; संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

by team

---Advertisement---

जामनेर : तालुक्यातील एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली. हि घटना सोमवार १ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तळेगाव येथील ग्रामस्थांनी संशयित आरोपीला पोलिसांच्या हवाली केले आहे. संगीताबाई पिराजी शिंदे (वय ३६ रा. शहापूर ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.

संगीताबाई शिंदे हि विधवा असुन ती गावात एकटीच राहत होती. संशयित आरोपी किरण संजय कोळी उर्फ लहान्या (वय ३०, रा.तळेगाव) याच्यासोबत तिचे काही महिन्यांपासून अनैतिक संबंध असल्याचे बोलले जात आहे. सोमवार, १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास किरण कोळी हा संगीताबाई हिच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आला होता. या ठिकाणी दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित किरण कोळी याने संगीताबाई हिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर घरातच तिचा खून करण्यात आला. तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून व् लाकडी दांडक्याने खून करण्यात आला. दरम्यान, ग्रामस्थांना याची खबर लागताच त्यांनी संशयित किरण कोळी याला तळेगाव येथून पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, संगीताबाई हिचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्याचे काम सुरू होते. जामनेर पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोनि किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक रोटे हे अधिक तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---