---Advertisement---

पाचोरा-भडगाव मतदार संघ काँग्रेसलाच सुटणार-निरीक्षक आत्माराम जाधव

by team
---Advertisement---

पाचोरा (प्रतिनिधी): – विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या निवडणुकीत पाचोरा – भडगाव मतदार संघ हा काँग्रेसलाच सुटणार असल्याचा दावा विधानसभा निरीक्षक आत्माराम जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी जरी असली तरी प्रत्येक पक्ष २८८ जागेची तयारीला लागले आहे याचाच भाग म्हणून प्रत्येक तालुक्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून विधानसभा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी उमेदवारीचे प्रतिनिधित्व केल्यामुळे सहाजिकच काँग्रेस पक्षाचा दावा जास्त जागांवर वाढला आहे. त्यातच महाविकास आघाडी घटक पक्षांना कमी आणि कॉंग्रेस ला झुकते माप द्यावे लागणार आहे. पाचोरा भडगाव मतदार संघासाठी विधानसभा निरीक्षक म्हणून आत्माराम जाधव यांची नेमणूक केली आहे. यापूर्वी तेलंगणा राज्याच्या निवडणुकीत आत्माराम जाधव यांनी ज्या मतदारसंघात निरीक्षक म्हणून काम केले तेथे विजय मिळवून दिला आहे. सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे काँग्रेसने आयोजन केले होते यावेळी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष ॲड. अमजद पठाण, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, राजेंद्र महाजन, विधानसभा युवक अध्यक्ष प्रदीप पाटील महिला काँग्रेस सरचिटणीस कुसुमताई पाटील संगीता नेवे, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मणियार, एससी सेल अध्यक्ष श्रावण गायकवाड, गणेश गायकवाड युवक विधानसभा उपाध्यक्ष कल्पेश येवले, प्रकाश चव्हाण, आदी उपस्थितीत होते यावेळी बोलताना श्री जाधव म्हणाले की पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात कॉग्रेस पक्षाने स्वातंत्र्या पासून गतवैभव प्राप्त करून दिले होते आज रोजगार नाही त्यामुळे येथील युवक भरकटत चालला आहे. आता एकमेव पर्याय आहे तो कॉग्रेस पक्ष असुन जळगाव जिल्ह्य़ातील महाविकास आघाडीत पाचोरा भडगाव मतदारसंघातुन कॉंग्रेसनेच दावा ठोकला आहे. या मतदारसंघात कॉग्रेस कशी जिंकेल याचे गणित आंम्ही वरीष्ठांना सांगणार असुन आमची तयारी सुरू झाली आहे. जागा सुटल्यावर उमेदवार निच्छित होणार आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला उमेदवार देणार असून तेलंगणा पॅटर्न राबवुन निवडुण आणण्याचा संकल्प यावेळी आत्माराम जाधव यांनी बोलुन दाखवला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment