---Advertisement---

ऑस्ट्रिया दौऱ्यामध्ये जागतिक शांततेची; भूमिका युद्धभूमीवर समस्या सोडविता येणार नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

by team
---Advertisement---

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर असून पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतली. यानंतर ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांच्याशी संयुक्त चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला.

संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रिया दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादास दोन्ही देशांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमधील बदलांनाही दोन्ही देशांची सहमती आहे. युक्रेनमधील संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील परिस्थिती असो, जगात सुरू असलेल्या संघर्षांबद्दल सविस्तर चर्चा झाली आहे. ही वेळ युद्धाची नाही, असे भारताचे स्पष्ट मत आहे.

युद्धभूमीवर समस्या सोडवता येत नाहीत. निष्पाप मुलांचा मृत्यू कोठेही झाला तरीही त्याचे कदापी समर्थन करता येणार नाही. जागतिक शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्गच योग्य असल्याविषयीदेखील दोन्ही देशांचे एकमत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, येत्या दशकासाठी सहकार्याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. हे केवळ आर्थिक सहकार्य आणि गुंतवणुकीपुरते मर्यादित नाही. पायाभूत सुविधांचा विकास, नवोपक्रम, नवीकरणीय ऊर्जा, हायड्रोजन, जल, कचरा व्यवस्थापन आणि क्वांटम यांसारख्या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे. दोन्ही देशांतील युवा शक्ती आणि कल्पना यांना जोडण्यासाठी स्टार्टअप्सना चालना दिली जाईल.

हालचाल आणि स्थलांतर यावर भागीदारीबाबत एक करार आधीच झाला आहे. कायदेशीर स्थलांतर आणि कुशल कामगारांना मदत केली जाईल. हवामान बदल आणि दहशतवाद यांसारख्या ज मानवतेला भेडसावणाऱ्या आव्हानांवरही दोन्ही राष्ट्रांनी चर्चा केली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment