दिशा सालियन प्रकरणात पोलीस नोंदवणार नितेश राणेंचा जबाब

by team

---Advertisement---

 

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. गुरुवार, दि. ११ जुलै रोजी त्यांनी याविषयी माध्यमांना माहिती दिली. नितेश राणे म्हणाले की, “दिशा सालियन-सुशांत सिंग राजपूतप्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. माझ्याकडे ८ जून आणि १३ जूनबाबत अनेक पुरावे आहेत.

या सगळ्याबाबत मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. या हत्येतील आरोपी आजही मोकाट विधानसभेत फिरत आहे. या प्रकरणात तीनवेळा तपास अधिकारी बदलण्यात आले. तपास अधिकार्‍यावर दबाव होता. तेव्हा आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते. नारायण राणे आणि माझी पोलीस ठाण्यात चौकशी झाली. त्यावेळी ठाकरेंकडून पोलिसांना वारंवार फोन येत होते.

आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियनवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ८ आणि १३ जून रोजी आदित्य ठाकरे कुठे होते, त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळालेले आहे. ७२ दिवसांनंतर सीबीआयला या प्रकरणाचा तपास करू दिला”, असे आरोप नितेश राणे यांनी केले.

८ जूनला आदित्य ठाकरे कुठे होते?

८ जून रोजी आदित्य ठाकरे कुठे होते? ते आजोबा आजारी असल्याची कारणे देत आहेत. मस्टरवरील एन्ट्री कोणी फाडली? ना आम्ही पुण्यातल्या अग्रवालला सोडणार, ना आम्ही मिहीर शहाला सोडणार, ना आदित्यला सोडणार. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल कुठे आहे? वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या बाहेर कोणाचा बंगला आहे? १३ जूनला कोणाचा वाढदिवस होता? कुणाची पार्टी झाली? तिथून सुशांतच्या घरी कोण गेले?’, असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---