---Advertisement---

पॅरिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारतातून श्वान पथक रवाना

by team
---Advertisement---

पॅरिस : फ्रान्समध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) एलिट डॉग स्क्वॉड के-९ तैनात करण्यात येणार आहे. के-९ हे डॉग स्क्वॉड दि. १० जुलैला पॅरिसला रवाना झाले. हे पथक २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या विविध ठिकाणी सुरक्षा पुरवण्याचे काम करेल.

ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणाऱ्या ठिकाणी सुरक्षा देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. के-९ पथकातील श्वान ऑलिम्पिकच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतील. सीआरपीएफच्या डॉग ब्रीडिंग अँड ट्रेनिंग स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या कडक चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची या कामासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सीआरपीएफने दिली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment