---Advertisement---

अनिल देशमुखाच्या अडचणीत वाढ? सचिन वाझेंचा गौप्यस्फोट

by team

---Advertisement---

मुंबई : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटकं ठेवणं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे आरोपी असून ते सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. तसेच अनिल देशमुख आणि सचिन वाझेंवर दरमहा १०० कोटी रुपये वसूलीचाही आरोप आहे. याप्रकरणात अनिल देशमुख १३ महिने तुरुंगात राहून सध्या जामीनावर बाहेर आहेत. दरम्यान, या वसूली प्रकरणाबाबत सचिन वाझेंनी अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा केला आहे.

सचिन वाझे म्हणाले की, “अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. सीबीआयकडे याबद्दलचे सगळे पुरावे आहेत. याबद्दल मी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. त्यात जयंत पाटील यांचंही नाव लिहिलं आहे. मी नार्को टेस्ट करण्यासाठी कधीही तयार आहे,” असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---