---Advertisement---

मद्याची चोरी, हॉटेलमधील जेवणावरही मारला ताव

by team

---Advertisement---

पारोळा : अमावास्येच्या पूर्वसंध्येला शहरातील एका हॉटेलमध्ये असलेली ४० हजार रुपयांची दारू, बिअरच्या बाटल्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे . याबाबत पारोळा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क हे शनिवार, ३ रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, ५ रोजी सकाळी हॉटेल व्यवस्थापक आला असता. त्यांने हॉटेल उघडले असता बाहेरील सामान अस्ताव्यस्त केलेले त्यास आढळून आले. हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या महागडी दारू, बिअर, सिगारेट असे घेऊन पोबारा केला. दरम्यान, चोरांनी महागड्या व्हिस्की हॉटेलमध्येच संपवल्या व किचनमध्ये जेवणावर ताव मारत चोरटयांनी पोबारा केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---