---Advertisement---

२१ टन ‘गोमांस’ जप्त! गुन्हे शाखेची धडक कारवाई…

by team

---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली. यात तब्बल २१ टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. गोमांस तस्करीत गुंतलेली एकूण ९ वाहने पोलिसांनी जप्त केली असून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी पोलीस ठाण्याअंतर्गत घडले आहे.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग एंट्री पॉइंटजवळ एक मोठा अवैध कत्तलखाना असून त्यात मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून गोमांसाची तस्करी केली जात असल्याची माहिती स्थानिक गोरक्षकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलखान्याजवळील एका खासगी हॉटेलमध्ये गोमांस भरलेली ९ वाहने जप्त केली. या कारवाईत २१ टन गोमांस जप्त केले असून कत्तलखानाही सील करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---