---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील २० अंमलदारांची पोलिस उपनिरिक्षक पदोन्नतीने पदस्थापना

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्हा पोलिस दलातील विभागीय अर्हता परीक्षा २०१३ उत्तीर्ण केलेल्या २० अंमलदारांची निःशस्त्र पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.  यासंदर्भातील आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. यातील १४ जणांची कोकण २ विभागात तर ६ जणांची नाशिक विभागात पदस्थापना करण्यात आली.

ही पदोन्नतीचे पदे सामान्य प्रशासन विभागाच्या ७ में २०२१च्या विरोधात सर्वोच्च न्यायालया दाखल अनुमती याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या अंतिम आदेशाच्या अधिन राहून भरण्यात आली आहेत. पदोन्नती झालेल्या अंमलदारांना त्यांच्याकडील दप्तराचा कार्यभार, शासकीय कीट आदी साहित्य ओळखपत्र पोलिस मुख्यालयात तातडीने जमा करून मंगळवारी दुपारी जळगाव जिल्हा पोलिस दलातून कार्यमुक्त करण्यात आले.

ग्रेड पोलिस उपनिरिक्षक मो. अली सत्तार अली सय्यद (भुसावळ शहर), प्रताप पाटील (मसुप, चाळीसगाव), शशिकांत पाटील (पहूर), नितीन चव्हाण (यावल), प्रकाश महाजन (एएसपी कार्यालय, चाळीसगाव), संजय जाधव (पोलिस मुख्यालय), सहाय्यक फौजदार शेख युनुस (स्थानिक गुन्हा शाखा), नरेंद्र कुमावत (जिविशा), शशिकांत पाटील (जिविशा), रामदास पावरा (चोपडा शहर), प्रदीप सुरवाडे (मसुप, पाळधी), मिलिंद शिंदे (मेहुणबारे), संजय भांडारकर
( रामानंद नगर), नाशिक विभाग: ग्रेड पीएसआय भास्कर पाटील (दविक, जळगाव), देविदास बाथ (पोलिस मुख्यालय), राजेंद्र साळुंखे (चाळीसगाव ग्रामिण), हंसराज मोरे (पाहूर), सहाय्यक फौजदार भाऊसाहेब पाटील (एसडीपीओ, चाळीसगाव), पोलिस हवालदार महेद्र पाटील (एसडीपीओ, फैजपूर).

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment