वक्फ बोर्ड असो किंवा कुठलीही जमीनीला हात लावलेला खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरे

by team

---Advertisement---

 

मुंबई : वक्फ बोर्ड असो किंवा कुठलीही जमीन असुदे, त्याला हात लावलेला खपवून घेणार नाही, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. काही दिवासांपूर्वी वक्फ बोर्डाच्या मनमानीला चाप लावण्यासाठी संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपल्यामध्ये आग लावण्यासाठी उगाच वक्फ बोर्डाचं बिल आणलं. तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही ते मंजूर का करुन दाखवलं नाही? त्यावेळी शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते असं सांगण्यात आलं. पण त्यावेळी मी स्वत: आणि माझे सगळे खासदार दिल्लीत होते. त्या बिलावर चर्चा होणार असल्याचं ठरवलं असतं तर माझे खासदार येऊन बोलले असते. महाराष्ट्रातही किती राजकारण्यांनी मंदिरांची आणि संस्थांची जमीन ढापली त्याची यादी काढा. वक्फ असो किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असो, आम्ही त्यामध्ये काहीही वेडवाकडं होऊ देणार नाही,” असे ते म्हणाले.

संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मांडल्यानंतर दोन दिवसांनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम समुदायातील काही लोक जमले आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली. उबाठाला केवळ आमची मतंच हवी आहेत का? त्यांना आमची कामं करायची नाहीयेत का? अशा घोषणा देत त्यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंच्या एकाही खासदाराने त्यादिवशी या विधेयकाच्या विरोधात आवाज उठवला नाही, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---