---Advertisement---

राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे बेमुदत उपोषण , काय आहेत मागण्या

by team
---Advertisement---

जळगाव : ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या परिचालक (आपले सरकार सेवा केंद्र चालक) यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेतर्फे जिल्हा परिषद समोर मंगळवार २० पासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य अध्यक्ष सुनीता आमटे ह्या करीत आहेत .

या आहेत प्रमुख मागण्या

१९  जून २०२४  रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील ग्राम उद्योजक हा शब्द हटवून सर्व संगणक परिचालक यांना संगणक परिचालक म्हणून ग्राम पंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्यात यावे.

जुलै महिन्यापासून करण्यात आलेली १०  हजार रुपयांची मानधन वाढ कोणतीही सबब न देता विना अट त्वरित अदा करण्यात यावी. झालेली मानधन वाढ दर महिन्याला एक निश्चित तारखेला देण्यात यावी.

शासनाने महा आयटी कंपीनीशी १ जुलै २०२४  पासून करार केलेला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक चालकांना नियमित करणे.  कोणालाही कामावरुन काढून टाकण्यात येणारं नाही याची लेखी हमी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात अशी मागणी उपोषण कर्त्यांनी दिली आहे.

या बेमुदत उपोषणात राज्य सचिव नारायण मोठे,  राज्य उपाध्यक्ष महिला अबोली अवसरे,  राज्य उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे याप्रसंगी विजय शेळके, जळगाव जिल्हाध्यक्ष श्रावण बोदडे, जिल्हा संघटक प्रभाकर तायडे, जिल्हा संपर्क प्रमुख रोनाक तडवी, महिला जिल्हा संघटक वंदना सपकाळे ,  राज्य प्रतिनिधी राहुल मोरे ,  धुळे जिल्हाध्यक्ष मनोज राजपूत ,  धुळे जिल्हा सचिव जितेंद्र राजपूत . शिरपूर तालुकाध्यक्ष जहागीरदार पावरा, जळगाव जिल्हा सरचिणीस कैलास मनुरे, जळगाव जिल्हा सहसचिव  डिगांवर पावरा, जिल्हा कोषाध्यक्ष तुषार चौधरी ,  पारनेर तालुकाध्यक्ष अरविंद नरसाळे, जळगाव तालुकाध्यक्ष ईश्वर सपकाळे ,  बोदवड तालुकाध्यक्ष अमोल तायडे, सुधाकर महाजन ,  जिल्हा सचिव अनिल पवार आदींचा समावेश आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment