उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मविआ ने घेतला महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे!

by team

---Advertisement---

 

मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर शरद पवारांनी उद्या महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता काँग्रेसनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोर्टाचा आदर करून हा बंद मागे घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटले आहे. त्यामुळे आता मविआकडून उद्याचा महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

नाना पटोले म्हणाले की, “कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा दाखवून आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सरकारच्या धोरणाविरोधात शांततेत बसणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या बेबंदशाहीविरोधात आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन बसणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

“मुंबईत उद्धव ठाकरे, मी ठाण्यात, नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण पुण्यात हे सगळे नेते वेगवेगळ्या भागात एक तासाचं बैठं आंदोलन करणार आहोत. कोर्टाचा आदर करून आम्ही ही वाटचाल करत आहोत,” असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---