---Advertisement---

बांधकाम साईटवरुन ३ लाख रुपयांचे वायरचे बंडल चोरटयांनी केले लंपास

by team

---Advertisement---

जळगाव  : अपार्टमेंटमधून अज्ञात चोरटयांनी ३ लाख १२ हजार रुपये किमतीचे वायरचे बंडल चोरुन नेल्याची घटना २९ रोजी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायीक धैर्यशील जगतराव चौधरी हे  जोशी पेठे येथे राहतात. त्यांची जूनाखेडी रोड परिसरातील प्रेमचंद नगरात नवीन अपार्टमेंटचे काम सुरु आहे. अपार्टमेंटच्या बांधकामाचे काम पुर्ण झाले आहे. या अपार्टमेंटचे इलेक्ट्रीक वायरिंगचे काम केले जात आहे.  त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रीक साहित्य खरेदी केले होते. गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या अपार्टमेंटमध्ये वायरिंग केलेल्या वायरसह इतर वायरचे बंडल असा एकूण ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच चोरट्यांनी पीव्हीसी पाईप व पीओपीचे नुकसान देखील केले. ही घटना शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर धैर्यशील चौधरी यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल साळुंखे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---