---Advertisement---
जळगाव : आत्तापर्यंत तुम्ही चोरटयांनी घरातून सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू चोरुन नेल्याची बातमी वाचली असेल. मात्र, शहरातील निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या घरातून चोरटयांनी अशी वस्तू चोरुन नेली, ज्याची नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
जळगाव शहरातील दादावाडी येथील श्रीराम नगरात तुकाराम नामदेव गांधिले (६३) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ते पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे घर ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ३१ ऑगस्ट सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान बंद होते.
अज्ञात चोरट्यांनी गैरफायदा घेत घरात ठेवलेले गॅस सिलेंडर चोरून नेल्याचा अजब प्रकार घडला. यासंदर्भांत सोमवार, २ सप्टेंबर रोजी जळगाव तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.
दरम्यान, निवृत्त पोलीस उपनिरीक्षच्या घरातून चोरटयांनी गॅस सिलेंडरचं का पळविले ? याचीच चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.
---Advertisement---