---Advertisement---

Ganesh Chaturthi 2024 : आपल्या लाडक्या गणपत्ती बाप्पाची मूर्ती कोणत्या दिशेला बसवावी याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

by team
---Advertisement---

गणपती बाप्पाच्या येण्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शनिवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10:51 ते दुपारी 1:21 पर्यंत गणपती बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. लाडक्या गणपत्ती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वांना घरात छान सजावट केली आहे. पण सर्वांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे घरात बाप्पाच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला हवं. याबद्दल जाणून घेऊया

घरात गणपतीची मूर्ती आणण्याआधी वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला तोंड असावं याबद्दल माहिती करून घ्या. वास्तुशास्त्रानुसार श्रीगणेशाची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे शुभ परिणाम होतात. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी ईशान्य कोपरा अतिशय शुभ मानला जातो.

घराच्या उत्तर-पूर्व दिशेलाईशान्य कोपरा म्हणतात. पण चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला गणपतीची मूर्ती बसवू नये. तो अशुभ मानला जातो. श्रीगणेशाची मूर्ती पाठ दिसणार नाही अशा पद्धतीने बसवण्याची विशेष काळजी घ्यावी. कारण घरात पाहुणे असूदेत किंवा घरातील सदस्य कोणाचीही बाप्पाकडे पाठ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment