बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाच्या मागे एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्या एक्स्पायरी डेटनंतर ती वस्तू वापरता येत नाही, असा लोकांचा समज आहे. पण हे पूर्ण सत्य नाही. तज्ज्ञांच्या मते एक्सपायरी डेटनंतरही काही गोष्टी खाल्ल्या तरी, आरोग्याला काही धोका पोहचत नाही.
प्रत्येक खाद्यपदार्थ किती काळ वापरला जाऊ शकतो आणि सुरक्षितपणे खाऊ शकतो याचा निश्चित कालावधी असतो. बाजारातून एखादी वस्तू विकत घेतली तर त्याच्या पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट म्हणजेच वस्तुच्या वापराची शेवटची तारीख लिहिली जाते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की पॅकेजिंगवर लिहिलेल्या तारखेनंतर लगेचच अन्न खराब होते आणि ते पुन्हा खाऊ शकत नाही. परंतु, एका इंग्रजी वृत्तपत्राने ने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सपायरी डेट ही केवळ मार्गदर्शक तत्त्वे आहे. काही उत्पादने एक्सपायरी डेटच्या दिवशी लगेच खराब होत नाहीत आणि काही वस्तू एक्सपायरी डेटनंतरही सुरक्षितपणे वापरता येतात. त्यामुळे तुमच्या आरोग्याला कुठलीही हाणी पोहचत नाही. किंवा काही वाईट परिणामही दिसत नाहीत. काहीवेळा पदार्थाची एक्सपायरी डेट संपली असली तरी, पदार्थांची चव, रंग, वास या गोष्टी पाहूनच तो पदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही ते ठरविता येते.
१.अंडी
अंड्याच्या कॅरेटवर किंवा पॅकेजवर कोणतीही एक्स्पायरी डेट लिहिलेली असली तरी, खरेदी केल्यापासून तीन ते पाच आठवड्यांपर्यंत अंडी सहज वापरता येतात. सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील रोसेन कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे प्रोफेसर केविन मर्फी, फूड सेफ्टी अँड सॅनिटेशन एक्सपर्ट यांच्या मते, अंड्यांवर लिहिलेली एक्सपायरी डेट अंडी किती ताजी आहे हे ठरवू शकते. मात्र, उकडलेले अंडे लवकर खराब होतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर वापरता येतात. जर तुम्हाला वाटत असेल की अंडी खराब झाली आहेत, तर त्यासाठी त्यांची पाण्यात चाचणी करता येते. जर अंडी पाण्याच्या वर तरंगत असेल तर ती जुनी समजली जातात. अशा परिस्थितीत, त्याच्या वासाने, आपण ते वापरण्यास योग्य आहे की नाही हे शोधू शकता.
२.दूध
कोणतेही पॅकेज केलेले दूध एक्स्पायरी डेटच्या आठवडाभरानंतरही वापरता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण दुधात फॅटचे प्रमाण किती आहे हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. एक्सपायरी डेटनंतर सात ते दहा दिवस फॅट नसलेले दूध वापरता येते. तर, फुल फॅट दूध एक्सपायरी डेटनंतर पाच ते सात दिवस वापरता येते. डेअरी नसलेले दूध कालबाह्य तारखेनंतर १ महिन्यापर्यंत वापरले जाऊ शकते. दूध खराब झाले तर घट्ट होऊन आंबट वास येऊ लागतो.
३. ब्रेड
ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील कॅनेडियन-आधारित पदवीधर नोंदणीकृत आहारतज्ञ मेगन वोंग यांच्या मते, पॅक केलेला ब्रेड सामान्यत: कालबाह्य तारखेनंतर पाच ते सात दिवस वापरला जाऊ शकतो, जेव्हा खोलीचे तापमान सामान्य असते आणि ब्रेड थंड जागी ठेवला असेल तर, तो ब्रेड आणखी काही काळ खाण्यायोग्य मानला जातो. जर तुम्हाला ब्रेड एक्स्पायरी डेटनंतरही वापरायचा असेल तर तुम्ही फ्रिजमध्येही ठेवू शकता. यासह, ब्रेड किमान तीन महिने खायला चांगली राहील. पण नेहमी ब्रेडवर येणारी बुरशीवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला ब्रेडवर निळसर-हिरवा रंग साचलेला दिसला तर ब्रेड फेकून द्या आणि खाऊ नका.
४. पास्ता
पाकिटावरील एक्सपायरी डेटनंतर दोन वर्षांपर्यंत सुका पास्ता खाल्ला जाऊ शकतो आणि सुपरमार्केट रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेला कच्चा पास्ता साधारणपणे एक्स्पायरी डेटनंतर चार ते पाच दिवसांसाठी वापरता येतो. शिजवलेला पास्ता रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित ठेवल्यास सहा ते आठ महिने वापरता येतो.
५. पनीर
लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील नोंदणीकृत आहारतज्ञ सोफिया नॉर्टन यांच्या मते, बहुतेक पनीरची कालबाह्यता तारीख नसते. वास्तविक, काही पनीरच्या पृष्ठभागावर पांढरा किंवा निळसर-हिरवा रंग बुरशीसारखा दिसू लागतो. जर तुम्हाला पनीरवर अशी बुरशी दिसली तर तो भाग कापून टाका, पनीर पुन्हा वापरण्यास सुरक्षित राहील. त्याची शेल्फ लाइफ पनीरचा वास आणि चव पाहून देखील ओळखता येते.
६. कच्चे मांस, पोल्ट्री आणि मासे
कच्चे मांस आणि चिकन सामान्य फ्रीजमध्ये काही दिवस टिकू शकतात, परंतु फ्रीजरमध्ये ठेवल्यास ते जास्त काळ टिकू शकतात. फ्रोझन ग्राउंड मीट फ्रीजरमध्ये तीन ते चार महिने टिकते. FoodSafety.gov नुसार, अन्न विषबाधा करणारे जीवाणू फ्रीझरमध्ये वाढत नाहीत, त्यामुळे कोणतेही अन्न किती काळ डीप फ्रीझमध्ये ठेवता येते आणि ते खाणे सुरक्षित असते. कित्येक महिने फ्रीजरमध्ये ठेवलेल्या गोष्टींना चव तितकीशी चांगली नसते, पण त्या खाण्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. कच्चा मासा सहा ते नऊ महिने टिकतो. कॅन केलेला मासा खाल्ल्यापासून दोन ते पाच वर्षांनंतर खाण्यास सुरक्षित मानला जातो.