---Advertisement---

दुर्दैवी ! कामावर निघाला अन् काळाने केला घात, बसच्या धडकेत तरुण जागीच ठार

by team

---Advertisement---

जामनेर: तालुक्यात कामावर जाणाऱ्या तरुणाला एसटी महामंडाच्या बसने जोरदार धडक दिली. यात तो तरुण जागीच गतप्राण झाला.हा भीषण अपघात आज रविवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. निलेश तुकडसिंग नाईक (डांगरे, वय २७, रा. गोदरी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

निलेश नाईक हा गोदरी येथे आई, वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी, चार भाऊ यांच्यासह वास्त्यव्याला होता. तो जामनेर येथील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियागृह विभागात सहाय्यक होता. रविवारी निलेश हा त्याची दुचाकी (एम. एच. २० जीवाय ४५७१) ने कामावर जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजता निघाला. गाव सोडून थोडें अंतर पुढे आल्यावर त्याच्या दुचाकीला सोयगाव डेपोची बस क्रमांक (एम एच २० बीएल २३९३) ने त्याला जोरदार धडक देत त्याची दुचाकी फरफट नेली. यात निलेश जागीच ठार झाला.

फत्तेपुर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.  यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला होता. तर अपघात करणारी बस व बस चालक ताब्यात घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे गोदरी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---